Pages

Wednesday, 18 November 2015

एका समर्पित जीवनाचा अंत हिंदुत्त्वाचा आणखी एक तारा निखळला !

'बाबरी' पाडल्यानंतर भाजपचे नेते सुंदरलाल भंडारी यांनी वक्तव्य केले होते की, 'बाबरी'चा ढाचा शिवसैनिकांनी उद्धवस्त केला आहे; त्यानंतर भंडारी यांच्या वक्तव्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर देताना म्हटले होते की, जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे. या वक्तव्याची आज प्रकर्षाने आठवण होत आहे. आजच्याच दिवशी हिंदुत्त्वाचा गजर निधड्या छातीने देणाऱ्या बाळासाहेबांना जावून तीन वर्ष झाली आहेत. त्यानंतर बरोबर याच  दिवशी दुर्दैवाने हिंदुत्त्वासाठी संपुर्ण आयुष्य खर्ची घालणारे अशोक सिंघल यांनी आपला देह ठेवला.

1992 साली बाळासाहेबांच्या व्यक्तव्यावरुन जगभरात वादळ उठले होते. या वादळाची ज्यांनी निर्मिती केली.त्यासाठी वारंवार धर्मसंसदा, संतबैठका, धर्मसभा आदिंमधून केलेल्या जागृतींमुळे निद्रिस्त हिंदू समाज जागृत झाला. आज त्या महायोद्धा अशोक सिंघल यांची प्राणज्योत मालवली, हा दुदैवी योग आहे.हिंदुत्त्वाच्या क्षितीजावरचा दुसरा ताराही निखळला.

मिनाक्षीपुरम  येथे जेव्हा दलितांचे झपाट्याने इस्लामीकरण सुरू झाले होते, तेव्हा त्यांना विधायक मार्गाने अटकाव घालणे, अत्यंत आवश्यक होते.अशावेळी विश्वहिंदू परिषदेच्या माध्यमातून अशोकजींनी त्या धर्मांतरीत दलितांपैकी बहुतेकांना पुन्हा हिंदू धर्माच्या कक्षेत आणलं. त्यांना व्यासपीठ दिले, नवा आत्मविश्वासही दिला. त्यांचे हे राष्ट्रीय कार्य वाखणण्याजोगे आहे.

1990 मध्ये राम मंदिर आंदोलनात सिंघल यांचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनामुळेच सिंघल देशभरात चर्चेत आले. त्यांच्याच कुशल नेतृत्वाखाली उभारलेल्या लढ्यातून पुढे राम जन्मभूमी मुक्त झाली. या ऐतिहासिक आंदोलनामुळे हिंदुत्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी सिंघल यांचा जीवनपट कायम प्रेरणा देत राहील.

सिंघल यांच्यावर सरसंघचालक गोळवळकर गुरुजींचा मोठा प्रभाव होता. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले. सुरुवातीला उत्तर प्रदेशात त्यानंतर त्यांनी दिल्ली व हरियाणाचे प्रांत प्रचारक म्हणूनही काम केले. 1980 साली त्यांची विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर 1985 साली त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2011 पर्यंत त्यांनी विहिंपचे अध्यक्षपद भूषवले.

अशोक सिंघल यांचा जन्म 15 सप्टेंबर 1926 रोजी आग्रा येथे झाला. 1942 साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. देशाच्या फाळणीनंतर 1948 मध्ये संघावर बंदी घालण्यात आली. त्यावेळी त्यांना तुरुंगातही पाठवण्यात आले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर सिंघल यांनी 1950 साली वाराणसी हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ  टेक्नॉलॉजी येथून मेटलर्जिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

असे बनले संघ प्रचारक
1947 मध्ये देशाच्या फाळणीनंतर ते पूर्णपणे संघात काम करू लागले. 1948 मध्ये संघावर बंदी घालण्यात आली त्यावेळी त्यांना तुरुंगातही पाठवण्यात आले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केले. सिंघल यांच्यावर सरसंघचालक गोळवळकर गुरुजींचा मोठा प्रभाव होता. ते दीर्घकाळ प्रचारक म्हणून कानपूरमध्ये राहिले.
1975 ते 1977 पर्यंत देशात आणीबाणी आणि संघावर बंदी होती. त्याकाळात इंदिरा गांधींच्या सरकारविरोधी आंदोलनातही सहभागी झाले.
आणीबाणी संपल्यानंतर ते दिल्ली प्रांताचे प्रचारक बनले.
1981 मध्ये दिल्लीत एक हिंदु संमेलन झाले. त्यात मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यानंतर सिंघल यांना विश्व हिंदु परिषदेची जबाबदारी सोपवण्यात आली.
नव्वदच्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनात विश्व हिंदु परिषद आघाडीवर असल्याने सिंघल देशभरात चर्चेत आले.
देशात विश्व हिंदु परिषदेची ओळख निर्माण करण्याचे श्रेय सिंघल यांनाच जाते.
---------------------------------------------------------------------------

"राम मंदिराचे बांधकाम हे इस्लामच्या विरोधात नाही. अयोध्या, काशी आणि मथुरा यांवरील अधिकार मागे घेऊन मुसलमानांनी शांततेत रहावे. यामुळे हिंदू आणि मुसलमान यांच्यातील मधुर संबंध दृढ रहातील."
- अशोक सिंघल
---------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment