Pages

Tuesday, 23 June 2015

शिक्षणमंत्री विनोद तावडेंचीच पदवी बोगस!

पक्षांतील ‘साहेबांची’ नाराजी भोवली
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून स्वतःच मराठ्यांचे नेते समजू लागलेले व मुख्यमंत्रीपदासाठी नव्याने बाशिंग बांधून उभे राहणार्‍या उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना त्यांच्याच पक्षातील ‘दानवांनी’च चांगलेच खिंडीत गाठले आहे. बोगस डीग्रीच्या माध्यमातून त्यांना राजीनामा देवून त्यांचा पत्ता कायमचा कट करायचे षडयंत्र या अस्तानीतल्या निखार्‍यांनी केले आहे.

Monday, 15 June 2015

छगन भुजबळांचा बाजार उठला


सरतेशेवटी हसते ती नियती, अखेर आज नियतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रुपाने हसत हसत पुन्हा एकदा फास आवळला भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक व तत्कालीन बांधकाम सचिव दिपक देशपांडे यांच्या घरावर छापा टाकला व कोट्यवधींचा ऐवज जप्त केला. यामुळे भुजबळांच्या अडचणी अधिक मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यांचे उरले सुरले बळही संपले आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसह सर्वच छोट्या मोठ्या नेत्यांनीही हात वर केले आहेत. अखेर भुजबळ एकाकी पडले आहेत. त्यांचा बाजार आता उठला आहे. नियती मात्र खदाखदा हसत आहे.

छगन भुजबळ यांच्याकडे प्रमाणाबाहेर संपत्ती असावी, असा संशय आहे. अशी अनेक प्रकरणे हळूहळू उजेडात येत आहेत. गेली कित्येक वर्षे जो नेता महाभ्रष्ट आहे त्याची बालंबाल खात्री लोकांना होती. त्यावर हे शिक्कामोर्तब होत आहे. प्रश्‍न आहे ज्या भुजबळांनी हे ‘सत्कार्य’ केले, ते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली असे शरद पवार यांचे या प्रकरणांना उत्तेजन होते कि संरक्षण होते हे समजायला मार्ग नाही.
-हेमंत देसाई
ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक


Friday, 12 June 2015

420 महेश मोतेवारांप्रमाणे केतकर, वागळे, राऊत यांच्यावरही गुन्हे दाखल करा!

शिवसंग्राम संघटनेचे ठाणे शहर युवा अध्यक्ष अक्षय करंजवकर यांची मागणी
.................................
लाखो गोरगरिबांच्या कष्टाची कमाई हडपणार्‍या, चिटफंड महाघोटाळ्यातील आरोपी 420 महेश मोतेवार याने अब्जावधींची बेकायदेशीरपणे माया कमवली. यामुळे त्याच्याबरोबर काम करणार्‍या भारतकुमार राऊत, कुमार केतकर, निखिल वागळे यांनाही तितकेच दोषी ठरवून त्यांच्यावरही भारतीय दंड संविधानानुसार गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी धक्कादायक मागणी शिवसंग्राम संघटनेचे ठाणे शहर युवा अध्यक्ष अक्षय करंजवकर यांनी केली आहे.

दहा-बारा वर्षांपुर्वी ऑटो रिक्षा चालवणार्‍या महेश मोतेवार यांनी समृध्दी जीवन व साईप्रसाद लँडमार्क या कंपन्या उघडून लाखो गुंतवणूकदारांना चुना लावला. यातून मिळवलेल्या अब्जावधींच्या मलिद्यातून त्यांनी मी मराठी चॅनल व मी मराठी लाईव्ह हे वृत्तपत्र विकत घेतले. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश सर्वप्रथम मुंबई मित्रने परवाच्या अंकात केला. या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ माजली. मोतेवार व त्यांच्या कंपुची तर पाचावर धारण बसली. मुंबई मित्रचे अंक तर सकाळीच स्टॉलवरुन हातोहात संपले होते. या संबंधी चांगले व वाईट प्रतिक्रीया देणारे फोन खणखणत होते. या गुन्हेगाराचा व त्याला साथ देणार्‍या गुन्हेगारांचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने सर्वांनीच मुंबई मित्रचे आभार मानले.

मी मराठीच्या माध्यमातून मोतेवार हे स्वतःला क्लीन चीट घेऊ पाहत आहेत. वास्तविक या लोकांना लुबाडणार्‍या 420 मोतेवारांनी लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहेे. शेकडो जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही 420 मोतेवार मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद होवूनही त्याची कठोर अमलबजावणी होत नाही, ही दुदैवाची बाब आहे. त्यांच्या या कुकर्मात त्यांना साथ देणार्‍या कुमार केतकर, निखील वागळे, डॉ. भारतकुमार राऊत यांच्यावरही भारतीय दंड संविधानानुसार कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, अशी मागणीही बहुजन विद्यार्थी परिषदेचे संतोष गायकवाड यांनी केली आहे.
.................................

उठसुट हिंदुत्वावर बरळून आपल्य प्रसिद्धीचा कंडू शमवणार्‍या केतकर, वागळे यांनी जरा शांत बसावे. केतकरांनी तर त्यांची हयात सोनिया यांची लाचारी करण्यातच घालवली. आज ते मोतेवारांचे तळवे चाटत आहेत. एरवी हिंदुत्वावर शिंकरणार्‍या केतकर, वागळेंना आज मोतेवारांचा शेंबूडच काय पण विष्ठाही गोड लागत आहे. लाखो जनतेच्या हाय खाल्लेल्या पैशांतून स्वतःची तुंबडी भरणार्‍या या लाचार्‍यांनाही या महापापाचे धनी व्हावे लागेल, लाखो गोरगरिबांच्या मुलाबाळांचे तळतळाटही भोगावे लागणार आहेत, असेही अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी सांगितले.
...........................................................

मोतेवार यांनी लोकांचा लुटलेला पैसा हा त्यांनी त्यांच्या मी मराठी या चॅनल व मी मराठी लाईव्ह वृत्तपत्रात गुंतवला आहे. अशा प्रकारच्या लुटलेल्या पैशातून त्यांनी संबंधित कर्मचार्‍यांना दिलेला पगारही सरकार त्यांच्या अकाऊन्टमधून कधीही जप्त करू शकते. भारतीय दंड संविधान 120 ब अन्वये षडयंत्र रचणारा व त्याला सहकार्य करणारा तितकाच दोषी आहे. यामुळे जी शिक्षा 420 मोतेवारांना मिळेल तीच शिक्षा सरकारने या तिन्ही पत्रकारांना द्यावी, अशी मागणीही शिवसंग्राम संघटनेने केली आहे.
....................................................................................

लाखो गोरगरिब गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा चुना लावणार्‍या 420 महेश मोतेवार यांची सखोल चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉजिटर्स अ‍ॅक्ट (एमपीआयडी) लागू करण्यात यावा. जनतेच्या लुबाडलेल्या पैशातून जर मी मराठी चॅनल व मी मराठी लाईव्ह हे वृत्तपत्र विकत घेऊन चालवले जात असेल तर सरकारने ते जप्त केले पाहिजे. इतकेच नव्हे तर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर मोक्काची कारवाई केली गेली पाहिजे.
अ‍ॅड. विरेंद्र इचलकरंजीकर


अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषद

Wednesday, 10 June 2015

1700 कोटींचा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी 420 महेश मोतेवार मोकाट

मी मराठीच्या माध्यमातून सरकारदरबारी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न
........................................................................................................

फार नाही पण दहा-बारा वर्षांपूर्वी ऑटो रिक्षा चालवणारा महेश मोतेवार यांनी 1700 कोटी रुपयांची माया जमवली. हजारो गोरगरिबांच्या कष्टाच्या कमाईतून त्यांनी हे महापाप केले. आता हे महापाप लपविण्यासाठी व यापुढेही असेच कुकर्म चालू ठेवण्यासाठी त्यांनी मी मराठी लाईव्ह व मी मराठी या दोन माध्यम कंपन्यांची स्थापना केली. यासाठी कोट्यवधी रुपये ओतले. दिग्गज पत्रकारांच्या माध्यमातून सरकार दरबारीही अकुंश ठेवण्याचा व आपली कुकर्म झाकण्याचा महेश मोतेवार हे प्रयत्न करीत आहेत. 
.........................

मुंबई : महाराष्ट्रात 162 चिटफंड कंपन्यांनी राज्यातील जनतेचे 40 हजार कोटी लुटले आहेत. या चिटफंड कंपन्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी खासदार सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना या घोटाळा करणार्‍या 162 कंपन्यांची यादीच सादर केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने पावले टाकली जातील असे सोमय्यांना सांगितले.एनमार्ट, केबीसी, समृद्ध जीवन, ऑरेंज हॉलिडेज कंपनी, साईप्रसाद, गरवारे, श्री सुर्या, पर्ल्स, हरी ओम, मीरा, ट्विंकल आदी चिटफंड कंपन्यांचा यात समावेश आहे. या कंपन्यांकडून अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आली नाही. समृद्ध जीवन कंपनीचे मालक महेश मोतेवार यांनी समृद्ध जीवन चिटफंड कंपनी 2012 सालीच बंद केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. इतरांची बाजू पुढे आलेली नाही. 

रस्त्यावर भाजीपाला विकणारे, रिक्षाचालक यांसारख्या सर्वसामान्यांनी आपल्या कष्टाची पुंजी महेश मोटेवार या 420 आरोपीच्या कंपन्यांमध्ये गुंतवली. त्यातून 1700 कोटींहून अधिक रुपयांची माया जमा केली. ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. याविरुद्ध केतन तिरोडकर यांनी कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. सेबीने मोतेवारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनेही गुन्ह्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. सीबीआयने या मोतेवारांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे आदेशही दिले आहेत. ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर ह्यांनी डीजीपी ऑफिसला पार्टी केले आहे.
वास्तविक सेबीने समृद्ध जीवन व साईप्रसाद या मोतेवारांच्या कंपन्यांना प्रतिबंध घातला होता. तरीही मोतेवार व त्यांच्या या कंपन्यांनी बेनामी पद्धतीने 1700 कोटी रुपयांची फसवणूक केली. 

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवला जाणारा पत्रकारिता हा चौथा स्तंभही आता अत्यंत खिळखिळा झालेला आहे. पत्रकारितेत मोठमोठ्या गप्पा मारणारे कुमार केतकर, डॉ. भारतकुमार राऊत व निखिल वागळे यांसारखे तथाकथित दिग्गज हे या 420 मोतेवारचे तळवे चाटत आहेत. वटवट वागळे यांनी मागील वर्षी आयबीएन लोकमतमध्ये मोतेवारांची चिटफंड घोटाळ्यातील आरोपी म्हणून हेटाळणी केली होती. तेच वागळे आज मोतेवारांची लाचारी करीत आहेत. त्यांची लायझिनिंगची कामे करीत आहेत. 

याच मोतेवारांनी मी मराठी लाईव्ह हे नवीन वर्तमानपत्र मुंबईतून सुरु केले. इतकेच काय पण अधिकारी ब्रदर्सकडून मी मराठी हे चॅनलही विकत घेतले. त्यात कोट्यवधींची गुंतवणूक केली व असंख्य पत्रकारांना भल्यामोठ्या रक्कमेचे पॅकेज देऊन त्यांनाही या पापात सहभागी केले. आजही या शेकडो पत्रकारांच्या माध्यमातून मोतेवार सरकारदरबारी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत; मोतेवारांनी मी मराठीच्या उद्घाटनप्रसंगाला जणू राज्यातील सर्वच मंत्र्यांना आमंत्रित केले होते. यावेळी रामदास कदम, विनायक मेटे यांच्यासह असंख्य मंत्रीसंत्री आवर्जून उपस्थित होते. या दिग्गजांवरही कारवाईचा बडगा उचलायला हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळे मोतेवार मात्र कमालीचे नाराज होते. त्यांची ही नाराजी अद्यापही कायम आहे. 
याबाबत मोतेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलणे पसंत केले. वारंवार फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्सअप करूनही त्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

चाळीसगाव शाखेने मागील सहा महिन्यांत 47 लाख 30 हजार 914 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात कंपनीच्या संचालकांसह नऊ जणांविरुद्ध फेब्रुवारी 2013मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली होती. 
चाळीसगाव येथील तक्रारदार रवींद्र अशोक लांडगे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. या पुण्याच्या कंपनीने पशुधनाची स्कीम सुरू केली. हिरापूर व ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) शिवारात कंपनीतर्फे सुमारे 283 एकर जागा खरेदी करण्यात आली होती. शाखा उद्घाटनाच्यावेळी मोठा कार्यक्रम घेतल्याने या कंपनीने अल्पावधीतच परिसरातील शेतकर्‍यांना आपलेसे केले. त्यामुळे कंपनीकडे बहुतांश ठेवीदार हे शेतकरी होते. ठेवीदाराने पैसे दिल्यानंतर त्याच्या पैशातून कंपनीतर्फे म्हैस अथवा बकरी विकत घेतली जाईल. ती म्हैस अथवा बकरी प्रजनन योग्य झाल्यावर संबंधित ठेवीदाराला ती परत करण्यात येईल किंवा तिच्या किमती एवढी रक्कम देण्यात येईल, असे सांगून कंपनीने परिसरातील हजारो शेतकर्‍यांकडून पैसा गोळा केला. यावेळी कंपनीने शेतकर्‍यांशी तसा करार केल्यामुळे अल्पावधीतच विश्‍वास संपादन होत गेला.

समृद्ध कंपनीने जिल्हा व काही तालुक्यांच्या ठिकाणी आलिशान कार्यालये थाटली आहेत. एजंटला मोठ्या रकमेचे कमिशन दिले जाते. कमीतकमी पाच लाखांचे डिपॉझिट किंवा 75 आर. डी., एफ. डी. डिपॉझिट आणणार्‍या एजंटला 35 हजार रुपये किमतीची दुचाकी किंवा रोख रक्कम दिले जात होते. 
...........................

फार नाही बारा वर्षांपूर्वीपर्यंत महेश मोतेवार पुण्यात ऑटो रिक्षा चालवायचे. लकी ड्रॉ आणि इतर योजनांमार्फत त्यांनी गुंतवणुकदारांना आकर्षित केलं आणि ते एकामागोमाग एक कंपन्या खरेदी करत गेले, ज्यामध्ये न्यूज चॅनल्सचाही समावेश आहे. तर बाळासाहेब भापकर यांचा प्रवासही तंतोतंत असाच आहे. पंधार वर्षांपूर्वी भापकर पिंपरी-चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत राहून प्रिंटींग म्हणजे छ्पाईचा व्यवसाय करायचे. त्यांनीही गुंतवणुकदारांना आकर्षित केलं आणि ते एकामागोमाग एक कंपन्यांसह न्यूज चॅनल्सचेही मालक बनले.
..........................

चिटफंडातून कोणी लुटले?
समृद्ध जीवन आणि साईप्रसाद लॅण्डमार्क या चिटफंड कंपन्यांना प्रतिबंध घातला आहे.
हरी ओम, पर्ल अग्रो, ट्विंकल प्लांट्स अँड प्रोजेक्ट, ओम गोएंका या कंपन्यांची सेबीतर्फे चौकशी सुरु आहे. मात्र प्राथमिक चौकशीनंतर राज्य सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केबीसीने महाराष्ट्रातील अनेक गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचे उघड झाले होते. त्यानंतर या चिटफंड कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर गरवारे क्लब हाऊस, सायट्रस हॉटेल्स,ऑरेंज हॉलिडेज, एनमार्ट रिटेल्स गुरुप्रसाद, व्हर्जिन गोल्ड इंटरनॅशनल, मीरा रिअलटर्स या चिटफंड कंपन्या संशयाच्या फेर्‍यात आहेत.
..............

राज्यातील 162 चिटफंड कंपन्यांवर कारवाई करावी 
महाराष्ट्रामध्ये चिटफंड घोटाळ्याच्या माध्यमातून 40 हजार कोटींची लूट झाली आहे. तसेच राज्यातील 162 चिटफंड कंपन्यांवर कारवाई करावी.
- किरीट सोमय्या, भाजपा खासदार.
.......................

गोरगरिबांच्या कष्टाच्या कमाईतून मोतेवार यांनी तब्बल 1700 कोटींहून अधिक रक्कमेची माया जमा केली आहे. त्यांची कस्टडीयल इन्ट्रोगेशन करण्यात यावी. लोकांचे पैसेही तात्काळ देण्यात यावेत. 
- केतन तिरोडकर, ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते

- उन्मेष गुजराथी