
सरतेशेवटी हसते ती नियती, अखेर आज नियतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रुपाने हसत हसत पुन्हा एकदा फास आवळला भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक व तत्कालीन बांधकाम सचिव दिपक देशपांडे यांच्या घरावर छापा टाकला व कोट्यवधींचा ऐवज जप्त केला. यामुळे भुजबळांच्या अडचणी अधिक मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यांचे उरले सुरले बळही संपले आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसह सर्वच छोट्या मोठ्या नेत्यांनीही हात वर केले आहेत. अखेर भुजबळ एकाकी पडले आहेत. त्यांचा बाजार आता उठला आहे. नियती मात्र खदाखदा हसत आहे.
छगन भुजबळ यांच्याकडे प्रमाणाबाहेर संपत्ती असावी, असा संशय आहे. अशी अनेक प्रकरणे हळूहळू उजेडात येत आहेत. गेली कित्येक वर्षे जो नेता महाभ्रष्ट आहे त्याची बालंबाल खात्री लोकांना होती. त्यावर हे शिक्कामोर्तब होत आहे. प्रश्न आहे ज्या भुजबळांनी हे ‘सत्कार्य’ केले, ते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली असे शरद पवार यांचे या प्रकरणांना उत्तेजन होते कि संरक्षण होते हे समजायला मार्ग नाही.
-हेमंत देसाई
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
No comments:
Post a Comment