Pages

Tuesday, 29 December 2015

420 महेश मोतेवारला ठोकल्या बेड्या

‘मी मराठी, मी मराठी’ अशी कोल्हेकुई करीत रस्त्यावरचे भाजीवाले, शेतकरी, रिक्षावाले अशा 10 लाख गुंतवणूकदारांना तब्बल 2900 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालणार्‍या महेश मोतेवारच्या मुसक्या आज मंगळवारी अखेर पोलिसांनी आवळल्या. कायद्यापुढे मी मराठी सारखी प्रसारमाध्यमे, अफाट पैसा, ‘कुमार’सारखे कुख्यात पत्रकार अखेर फिके पडले. दरम्यान, 420 मोतेवारला अटक झाल्यामुळे लाखो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या फरार घोषित असलेल्या ‘समृद्ध जीवन’चे संचालक व प्रमुख महेश मोतेवार यांना सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यात दुपारी दोनच्या सुमारास मोतेवार यांना ताब्यात घेतले. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी महेश मोतेवार यांची गय केली जाणार नाही असे रविवारी सांगताच सोमवारी उस्मानाबाद पोलिसांनी कारवाई केली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिसांच्या रेकॉर्डवर महेश मोतेवार होते. मोतेवार यांच्याविरोधात तेथे गुन्हा दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ते फरार होते. मोतेवार यांच्यावर मुरूम पोलिस ठाण्यात 420 , 448 , 427 , 491 34 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून 35 लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, महेश मोतेवार यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस ताब्यात घेऊ शकले नव्हते. त्यामुळे ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांना 420 फसवणुकीच्या गुन्ह्यात उठझउ 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आले होते.

महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना मागील काही महिन्यांपासून सापडत नसल्याने त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले होते. मात्र, मोतेवार यांना राजकीय पाठबळ असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, सोमवारी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मोतेवार यांना पकडण्यास हयगय करणार नाही असे सांगत पोलिसांना एकप्रकारे आदेशच दिला होता. अखेर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पुण्यात मोतेवार यांना राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
420 मोतेवार हा 2013 पासून उस्मानाबाद पोलिसांच्या रेकॉर्डनुसार फरार असल्याची धक्कादायक बाब सर्वप्रथम मी समोर आणली. मोतेवार खुलेआम फिरत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली नव्हती मात्र उस्मानाबाद पोलिसांनी धाडसी कारवाई करत पकडले. पोलिसांनी समृद्ध जीवन चिट फंड व इतर गुन्ह्याचा तपास देश पातळीवर करणे गरजेचे आहे. अनेक लोकांनी आयुष्याची कमाई या संस्थेत लावली असल्याने आर्थिक गुन्हे शाखा किंवा स्वतंत्र टीमने तपास करणे गरजेचे आहे.
- संतोष जाधव, पत्रकार 
‘मी मराठी’ व ‘मी मराठी लाईव्ह’ या प्रसारमाध्यमांतून मोतेवारने मराठी गुंतवणूकदारांची कायमच फसवणूक केली आहे. 2012 साली मोतेवारांचा हा घोटाळा सर्वांत प्रथम उघडकीस आला होता. त्यावेळी आर आर पाटील व अजित पवार यांनी मोतेवार व त्यांच्या समृध्द जीवनवर कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र त्यांनी कारवाई तर सोडाच पण या 420 आरोपीला पाठिशी घातले.
- किरीट सोमैय्या, खासदार, भाजप
मोतेवारला तुरुंगात घरचे जेवण मिळावे, व त्याला त्वरीत जामीन मिळावा, यासाठी कुख्यात पत्रकार कुमार केतकर विशेष प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. खरं तर मराठी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात मोतेवारला केतकरांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. केतकरांची त्वरीत लाय डिटेक्टरने सखोल चौकशी केल्यास, मोतेवारची ‘कुंडली’ बाहेर येईल. याप्रकरणी एमपीआयडी कायद्यानुसार केतकरांनाही त्वरीत बेड्या ठोकून तुरुंगात पाठवा.
- दिलीप इनकर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

कुमार केतकर यांना मोतेवारने कामाला ठेवले म्हणून मोतेवारवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यात दिरंगाई करू नये. एमपीआयडी कायद्यानुसार पोलिसांनी केतकरांना त्वरीत अटक करावी, अन्यथा ते पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे.
- अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर
 अध्यक्ष, हिंदु विधिज्ञ परिषद

Wednesday, 23 December 2015

‘समृद्ध जीवन’चा 420 महेश मोतेवार फरार

पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवारला फरारी घोषीत केले
उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात 420, 448, 427, 491 34 IPC अंतर्गत गुन्हा दाखल
समृद्ध जीवन ग्रुपचे महेश मोतेवार यांना फरार घोषित करण्यात आले आहे. उस्मामानाबादच्या मुरुम पोलिसांनी मोतेवारांना फरार घोषित केले. गुंतवणूकदरांचे पैस परत केले नसल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

गेल्या 2 वर्षापासून पोलीस ज्याचा फरार म्हणून उल्लेख करत आहेत ते महेश मोतेवार अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले तरी त्याकाळात गृहखात्याला मात्र दिसले नाहीत. तसेच ‘अच्छे दिन आयेंगे’ असे सांगणार्‍या आणि काळा पैसा भारतात आणू व प्रत्येक भारतीयांच्या खात्यामध्ये कमीत कमी 15 लाख जमा करण्याची दिवा स्वप्न दाखविणार्‍या मोदी सरकारचेच राज्यामध्ये सरकार असूनही या देशातील कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या घामाचा पैसा समृद्धी जीवन योजनेमध्ये गुंतविणार्‍या महेश मोतेवार यांच्यावर काही ठोस पावले उचलेली दिसत नाहीत.

‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांना 420 फसवणुकीच्या गुन्ह्यात महेश मोतेवार उठझउ 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आले आहे. महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षापासून सापडले नाहीत. मोतेवारवर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात आहे 420 , 448 , 427 , 491 34 कलम अंतर्गत मोतेवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून 35 लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवारला फरारी घोषीत केले आहे. मात्र, महेश मोतेवारला फसवणुकीच्या गुह्यात अजून पोलिस अटक करू शकले नाहीत.

काय आहे प्रकरण?
शिवचंद्र रेवते आणि सांगलीचे तात्यासाहेब शिवगौंडा यांच्या भागीदारीत येनेगूर येथे रेवते एग्रो कंपनी होती. त्यात पुढे या भागीदारीत फूट पडली. त्यामुळे कंपनी वादात अडकली, अशा वादात रेवते यांनी तात्यासाहेब शिवगौंडा यांना फसवणूक करत सदर कंपनी महेश मोतेवार यांना 85 लाखात विक्री केली. त्यामुळे शिवगौंडा यांनी रेवते यांच्यासह मोतेवार विरोधात उमरगा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. 30 फेब्रुवारी 2010 रोजी गुन्हा नोंदवला गेला, यात महेश मोतेवार हे सह आरोपी आहेत. मात्र, या प्रकरणात महेश मोतेवार हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मोतेवारांना घोषित केले आहे.
महेश मोतेवार विरोधात मध्यप्रदेशमध्ये वॉरन्ट काढले आहे. 2000 रु. चे इनाम ठेवले आहे. तरीही त्यांना पासपोर्ट मिळतात. परदेशात ते लोक भ्रमण करतात. ते मुजोर झाले आहेत. सेबीच्या सेटने 6 महिन्यांचे 2 वेळा एक्सटेंशनही दिले आहे.   -    नरेश जैन, अर्थतज्ज्ञ
उन्मेष गुजराथी

Sunday, 20 December 2015

‘समृद्ध जीवन’ची खाती सील करण्याचे आदेश, 420 महेश मोतेवारला दणका

महाराष्ट्रातील सर्वात मोठा चिटफंड घोटाळा 
420 मोतेवार यांच्या पापाचा घडा अखेर भरला. सेबीने बंदी आणल्यानंतरही तब्बल 525 कोटी रुपयांची रक्कम गुंतवणुकदारांकडून हडप केल्याप्रकरणी केंद्रीय सहकार मंत्रालयाने कडक पावले उचलली आहेत. मंत्रालयाने समृद्ध गु्रप कंपनीच्या सर्व बँकांची खाती तातडीने सील करण्याचे आदेश दिले आहेत. सहकार मंत्रालयाकडून याबाबत विशेष तपास सुरू होता. तो पूर्ण झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले.

सेबीने बंदी आणूनही 525 कोटींचा महसूल टीव्ही चॅनल्स आणि संलग्न बिझिनेसमध्ये गुंतवला. त्यामुळे मोतेवारांवर याआधीच एफआयआर दाखल करण्यात आला होता. दरम्यान, समृद्ध जीवन गृपने विविध योजनांच्या माध्यमांतून आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग याबाबत विशेष तपास करत आहे.
मोतेवार त्यांच्या चॅनल्स व न्यूजपेपरमध्ये काम करणार्‍या बहुतेक कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारचे कन्फर्मेशन लेटर दिले जात नाही. इतकेच नव्हे तर त्यांचा व समृद्ध जीवनमधील एजण्ट्सचा पीएफ व टीडीएसचे पैसेही सरकार दरबारी जमा करत नाही.- अ‍ॅड. संजीव पुनाळेकर.
मोतेवार यांचा पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शेतकर्‍यांची व छोट्या-मोठ्या गुंतवणुकदारांची दिशाभूल करण्यासाठी महेश मोतेवार यांनी 'मी मराठी' व 'मी मराठी लाईव्ह' या प्रसारमाध्यमांचा दुरुपयोग केला आहे.- किरीट सोमैय्या, खासदार
हजारो सर्वसामान्य जनता, शेतकरी व गुंतवणूकदार यांच्या घामाच्या पैशांची लूट करणारे 420 महेश मोतेवार यांच्या 'ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेड' कंपनीचे संचालक व कुख्यात पत्रकार कुमार केतकर व मैत्रेयच्या सर्वेसर्वा वर्षा सत्पाळकर यांच्या मास कम्युनिकेशनच्या हेड जयश्री देसाई यांची (केतकर व देसाई) धरपकड केल्यास मोतेवार व सत्पाळकर यांची संपूर्ण 'कुंडली'च बाहेर पडू शकते. महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स अ‍ॅक्ट (एमडीआयडी) हा कायदा या दोन कुख्यात पत्रकारांवर लागू करावा, अशी मागणीही हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केली आहे. पुनाळेकर यांची ही मागणी मान्य झाल्यानंतर केतकर व देसाई ही जोडगोळी कोणत्या तुरुंगात खडी फोडणार, अशी उत्सुकता मराठी प्रसारमाध्यमांमध्ये लागली आहे.

Directions to freeze accounts of “Samruddh Jeevan”
420 Mahesh Motewar receives a jolt by the Central Government
Biggest chit (cheat ?) fund fraud of Maharashtra

Unmesh Gujarathi
Finally the Motewar’s pot of sin is full. Union Cooperative Ministry has initiated harsh measures against Motewar for defrauding investors to the tune of Rs 525 crore, despite curbs imposed by SEBI. Union Cooperative Ministry has ordered sealing of all bank accounts of “Samruddh Group of Companies” immediately. The ministry issued these orders after investigating the matter threadbare.

Despite SEBI ban, Motewar had invested Rs 525 crore in a TV channel and allied businesses. As such an FIR was registered against him. Besides, Motewar is also accused of financial mismanagement through other schemes of “Samruddh Jeevan Group” and Economic Offences Wing (EOW) has been investigating the matter. No confirmation letter are given to employees working in the TV channel or newspaper run by Motewar. The amount recovered towards the Provident Fund and TDS from the salary of the employees and the agents of the “Samruddh Jeevan” is also not being deposited into the treasury, Advocate Sanjiv Punalekar alleged.

“The process of impounding Motewar’s passport is on. Mahesh Motwar has been misusing “Mee Marathi” and “Mee Marathi Live” to swindle the farmers and small investors’.
...Kirit Somaiya, MP

All mis-deeds of Motewar and Satpalkar ,who have defrauded farmers and investors, could be exposed if Kumar Ketkar, a “notorious” journalist and director of “Broadcast Initiative Limited” and Jayashri Desai, Head of the Varsha Satpalkar’s “Maitrey Mass Communication” are arrested.  

Sanjiv Punalekar, the advocate and Secretary of the Hindu Vidhidnya Parishad has demanded that two journalists-Ketkar and Desai, be booked under the “Maharashtra Protection of Depositors’ Act”. The media is anxious to know whether these journalists are booked under this act and are sent to face rigorous imprisonment.


Thursday, 10 December 2015

‘मैत्रेय’कडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना; अब्जावधींची प्रॉपर्टी होणार जप्त?

  • चिटफंडप्रकरणी वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांना अटक होण्याची शक्यता
  • हजारो गुंतवणूकदारांकडून गोळा केली कोट्यवधींची काळी माया
  • ‘मैत्रेय’चे दस्तावेज तपासून सेबीने काढला निष्कर्ष

मुंबई : हजारो गुंतवणूकदारांना भूखंड देण्याच्या गोंडस नावाखाली त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांची काळी माया जमा करण्याच्या निष्कर्षावरून सेबीने मैत्रेयच्या सर्वेसर्वा वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांना सार्वजनिकरित्या लोकांकडून ठेवी गोळा करण्यात प्रतिबंध घातला आहे. कोट्यवधींच्या चिटफंड घोटाळयातील सेबीने दोषी ठरवलेल्या सत्पाळकर यांना फौजदारी खटला दाखल करून कोणत्याही क्षणी अटक होवू शकते.

राज्यात असणार्‍या बोगस चिटफंड कंपन्यांच्या मालकांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाणार आहेत. अशा तब्बल 62 बोगस चिटफंड कंपन्याची यादी सरकारने बनवली आहे. यापैकी साईप्रसाद प्रॉपर्टी लिमिटेडचे प्रमुख बाळासाहेब भोपकर यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या 15 बँकांतील 192 अकाऊंट खातीही सील करण्यात आली आहेत. हीच वेळ आता मैत्रेय प्लॉर्ट्स अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि. चे वर्षा सत्पाळकर व जनार्दन परूळेकर यांच्यावर येणार आहे.

सेबीने दोषी ठरवलेल्या सत्पाळकर यांची मालमत्ता जप्त होवू शकते, त्यांच्या कंपनीची नोंदणी रद्द होवू शकते व वेळ पडल्यास त्यांना अटकही होवू शकते.
सन 1999 साली मधुसुदन सत्पाळकर यांनी नेटवर्क मार्कटिंगच्या माध्यमातून मैत्रेय कंपनी स्थापन केली. मात्र दुदैवाने मैत्रेयची स्थापना होऊन केवळ पाच वर्षे उलटली असताना त्यांचे निधन झाले. त्यांनतर त्यांच्या पत्नी वर्षा सत्पाळकर यांनी या उद्योगाची धुरा हाती घेतली व 10 वर्षांच्या कालावधीत रिअ‍ॅलिटी, पब्लिकेशन, हॉस्पिटॅलिटी, कम्युनिकेशन, रुरल ग्रोथ व्हेंचर आणि सोशल सर्विसेस अशा विविध क्षेत्रात प्रवेश केला. यासाठी लागणारा हजारो कोटी रुपयांचा पैसा त्यांनी चिटफंडच्या माध्यमातून गोळा केला. त्यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांना भूखंड देण्याचे खोटे अमिष दाखवले. यासाठी मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि. ही कंपनी स्थापन करून गोरगरिब गुंतवणूकदारांना चुना लावला.

गुंतवणूकदारांच्या घामातून जमवलेला काळा पैसा त्यांनी चित्रपट, प्रकाशन, रिअ‍ॅल्टी, रिसॉर्ट्स यांसारख्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये गुंतवला, अशी माहिती ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दिली आहे. 

सेबीने निर्बंध आणल्यावर सत्पाळकरांनी त्यांच्या चिटफंड कंपनीतील अधिकार्‍यांच्या नावाखाली पुन्हा नव्या नावाने विविध कंपन्या सुरू केल्या व नव्याने ठेवी घेण्यास सुरूवात  केली. या कंपनीतील फायनान्स डिपार्टमेण्टमध्ये काम करणारे विजय तावरे, प्रिटींग विभागात काम करणारे ज्ञानेश्‍वर वैद्य, जमिनींचे व्यवहार बघणारे अजित पाठारे यांच्या नावावर नव्या कंपन्या सत्पाळकरांनी सुरू केल्या असून त्यांच्याद्वारे नवीन लोकांकडून नव्याने ठेवी घेतल्या जात आहेत. या सर्व व्यक्तींची त्वरीत चौकशी करण्याची मागणिही तिरोडकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप इनकर यांनी केली आहे.

मैत्रेय ग्रुपतर्फे प्रकाशित होणार्‍या ‘भटकंती’, ‘मैत्रीण’ ही मासिके व मैत्रेय प्रकाशन या संस्थांतही ही काळी माया गुंतवलेली आहे. 26 सप्टें 2014 रोजी त्यांनी ‘टपाल’ हा मराठी चित्रपट काढला होता. याशिवाय बोईसर येथील ‘मामाचा गाव रिसॉर्ट’मध्येही गुंतवणूकदारांच्याच घामाचा पैसा आहे. आजमितीला या चिटफंड कंपनीची 140 हून ऑफिसेस असून तेथून ठेवी गोळा केल्या जात आहेत. या सर्व ऑफिसेसला सील लावण्यात यावे, अशी मागणीही इनकर यांनी केली आहे.

मैत्रेयचे वसई, विरार, जळगाव व सांगली या भागांत अनेक गृहनिर्माण प्रकल्प आहेत. नाशिकला 40 बंगल्यांचा पांडववन प्रकल्प आहे. मुंबईजवळ ससूनवघर येथे 97 शाही बंगल्यांचा प्रकल्प उभारला जातोय. नाशिकमध्ये मैत्रेय ग्रीन प्रकल्प उभा रहात आहे. या सर्व प्रकल्पासाठी उभारला गेलेला पैसा हा सत्पाळकरांनी बेकायदेशीररित्या जमा केला आहे, त्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीजला त्वरीत सील करण्यात यावे, असेही तिरोडकर यांनी सांगितले.
मी 2014 मार्चला सेबीला अर्ज करून विचारले की, मैत्रेय ग्रुपवर काही कारवाई केली का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, आम्ही 2 नोटीसा मैत्रेय ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांना पाठविल्या आहेत.
खरे तर मैत्रेय ग्रुपने त्यांचा संपूर्ण बिझनेस रेसॉर्ट आणि कन्स्ट्रक्शनमध्ये डायव्हर्ट केला आहे. यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांचाही समावेश आहे. परंतु या कंपन्या ऑडिटमध्ये येत नाहीत. त्यांचा फंडींगसोर्सही कळत नाही. 
मी सेबीकडे मागणी केली की, मैत्रेय ग्रुपच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सवर बंदी आणावी. त्यांचे अकाऊंट सील करावे आणि योग्य ती कारवाई करावी. परंतु सेबीने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना केवळ 2 नोटीसा पाठविल्या. नंतर त्यांना 18 महिन्यांचे एक्सटेंशनही दिले.
मी सेबीविरूध्द अपीलही दिले, परंतु त्यांनी ते नाकारले.या घोटाळ्यामध्ये जनतेचे काय? त्यांचे पैसे बुडणार. आता त्यांनी जनतेकडून पैसा गोळा करणे बंद केले आहे. परंतु अगोदर वसूल केलेल्या पैशांचे काय? यात फक्त ट्रस्टची भलाई आहे. जनतेची मात्र फसवणूक होत आहे.
-मंदार दसुरे, आरटीआय कार्यकर्ते  (नाव बदलले आहे) 
---------------------------------- ---------------------------------- --------
  • चिटफंड प्रकरणातील 420 महेश मोतेवार यांच्याप्रमाणेच सत्पाळकर यांनाही प्रसिद्धी व पुरस्कारांची प्रचंड आवड आहे. यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या करीत असतात. वेळ पडल्यास पुरस्कार मॅनेजही करत असतात.
  • या सर्व आरोपांबाबत मैत्रेयच्या मास कम्युनिकेशनच्या हेड जयश्री देसाई यांना विचारले असता त्यांनी हे आरोप जुने असल्याचे सांगितले.
  • ‘मैत्रेय’ला नवीन ठेव योजना सादर न करण्याचे, कंपनीच्या संपत्ती व मालमत्तेच्या विल्हेवाटीस किंवा लोकांकडून मिळवलेल्या पैशाचा अन्यत्र विनियोग करण्यापासूनही मनाई करण्यात आली आहे.
उन्मेष गुजराथी