‘मी मराठी, मी मराठी’ अशी कोल्हेकुई करीत रस्त्यावरचे भाजीवाले, शेतकरी, रिक्षावाले अशा 10 लाख गुंतवणूकदारांना तब्बल 2900 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालणार्या महेश मोतेवारच्या मुसक्या आज मंगळवारी अखेर पोलिसांनी आवळल्या. कायद्यापुढे मी मराठी सारखी प्रसारमाध्यमे, अफाट पैसा, ‘कुमार’सारखे कुख्यात पत्रकार अखेर फिके पडले. दरम्यान, 420 मोतेवारला अटक झाल्यामुळे लाखो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या फरार घोषित असलेल्या ‘समृद्ध जीवन’चे संचालक व प्रमुख महेश मोतेवार यांना सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यात दुपारी दोनच्या सुमारास मोतेवार यांना ताब्यात घेतले. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी महेश मोतेवार यांची गय केली जाणार नाही असे रविवारी सांगताच सोमवारी उस्मानाबाद पोलिसांनी कारवाई केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिसांच्या रेकॉर्डवर महेश मोतेवार होते. मोतेवार यांच्याविरोधात तेथे गुन्हा दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ते फरार होते. मोतेवार यांच्यावर मुरूम पोलिस ठाण्यात 420 , 448 , 427 , 491 34 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून 35 लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, महेश मोतेवार यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस ताब्यात घेऊ शकले नव्हते. त्यामुळे ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांना 420 फसवणुकीच्या गुन्ह्यात उठझउ 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आले होते.
महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना मागील काही महिन्यांपासून सापडत नसल्याने त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले होते. मात्र, मोतेवार यांना राजकीय पाठबळ असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, सोमवारी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मोतेवार यांना पकडण्यास हयगय करणार नाही असे सांगत पोलिसांना एकप्रकारे आदेशच दिला होता. अखेर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पुण्यात मोतेवार यांना राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
420 मोतेवार हा 2013 पासून उस्मानाबाद पोलिसांच्या रेकॉर्डनुसार फरार असल्याची धक्कादायक बाब सर्वप्रथम मी समोर आणली. मोतेवार खुलेआम फिरत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली नव्हती मात्र उस्मानाबाद पोलिसांनी धाडसी कारवाई करत पकडले. पोलिसांनी समृद्ध जीवन चिट फंड व इतर गुन्ह्याचा तपास देश पातळीवर करणे गरजेचे आहे. अनेक लोकांनी आयुष्याची कमाई या संस्थेत लावली असल्याने आर्थिक गुन्हे शाखा किंवा स्वतंत्र टीमने तपास करणे गरजेचे आहे.
- संतोष जाधव, पत्रकार
‘मी मराठी’ व ‘मी मराठी लाईव्ह’ या प्रसारमाध्यमांतून मोतेवारने मराठी गुंतवणूकदारांची कायमच फसवणूक केली आहे. 2012 साली मोतेवारांचा हा घोटाळा सर्वांत प्रथम उघडकीस आला होता. त्यावेळी आर आर पाटील व अजित पवार यांनी मोतेवार व त्यांच्या समृध्द जीवनवर कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र त्यांनी कारवाई तर सोडाच पण या 420 आरोपीला पाठिशी घातले.मोतेवारला तुरुंगात घरचे जेवण मिळावे, व त्याला त्वरीत जामीन मिळावा, यासाठी कुख्यात पत्रकार कुमार केतकर विशेष प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. खरं तर मराठी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात मोतेवारला केतकरांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. केतकरांची त्वरीत लाय डिटेक्टरने सखोल चौकशी केल्यास, मोतेवारची ‘कुंडली’ बाहेर येईल. याप्रकरणी एमपीआयडी कायद्यानुसार केतकरांनाही त्वरीत बेड्या ठोकून तुरुंगात पाठवा.
- किरीट सोमैय्या, खासदार, भाजप
- दिलीप इनकर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
कुमार केतकर यांना मोतेवारने कामाला ठेवले म्हणून मोतेवारवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यात दिरंगाई करू नये. एमपीआयडी कायद्यानुसार पोलिसांनी केतकरांना त्वरीत अटक करावी, अन्यथा ते पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे.
- अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर
अध्यक्ष, हिंदु विधिज्ञ परिषद

No comments:
Post a Comment